शिलाँगमध्ये पंतप्रधान मोदी नॉर्थ ईस्टर्न कौन्सिलच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्यात सहभागी होतील. 7 नोव्हेंबर 1972 रोजी परिषदेचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. सकाळी 10.30 वाजता, पंतप्रधान स्टेट कन्व्हेन्शन सेंटर, शिलाँग येथे नॉर्थ ईस्टर्न कौन्सिलच्या बैठकीला उपस्थित राहतील. नंतर एका सार्वजनिक कार्यक्रमात, ते 2,450 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक प्रकल्पांचे उद्घाटन, लोकार्पण आणि पायाभरणी करतील.