आगरतळा: त्रिपुरामध्ये विधानसभा निवडणुकीदरम्यान केंद्रीय निमलष्करी दलाच्या सुमारे 300 कंपन्या तैनात केल्या जाणार आहेत.
पुढील आठवड्यापासून केंद्रीय दलाचे जवान त्रिपुरामध्ये येण्यास सुरुवात करतील, अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली.
त्रिपुरामध्ये “सुरक्षेला कोणताही विशिष्ट धोका नसला तरीही” निमलष्करी दलाचे जवान तैनात केले जातील.
स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुका सुनिश्चित करण्यासाठी त्रिपुरामध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात येणार आहे.
हे देखील वाचा: त्रिपुरा : कौटुंबिक वादातून महिलेने पतीची हत्या केली
सुरुवातीला त्रिपुरामध्ये CRPF, BSF, ITBP आणि CISF च्या 100 कंपन्या तैनात केल्या जातील.
त्यानंतर केंद्रीय निमलष्करी दलाच्या आणखी 200 कंपन्या निवडणूक कामासाठी त्रिपुरामध्ये दाखल होतील.
2018 च्या त्रिपुरा विधानसभा निवडणुकीत केंद्रीय दलाच्या 300 कंपन्या त्रिपुरामध्ये तैनात करण्यात आल्या होत्या.