आयएएस अधिकारी सुप्रिया साहू यांनी पॉइंट कॅलिमेरे वन्यजीव आणि पक्षी अभयारण्य येथे फ्लेमिंगोचे कळप दाखवणारा व्हिडिओ शेअर केला आहे. साहू यांनी ट्विट केले, “जादुई कोडियाक्कराई… महासागरातून उडणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांचे स्वागत करताना आनंद होत आहे. मुथुपेट्टाई खारफुटी परिसरात 50,000 हून अधिक फ्लेमिंगो आधीच दाखल झाले आहेत.” साहूने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये फ्लेमिंगोची वसाहत उड्डाण करण्यापूर्वी एकत्र धावताना दिसत आहे.